रात्री WhatsApp वर बोलताना Screen चा उजेड डोळ्यांना टोचतोय?? मग WhatsApp चा Dark Mode करा ON.

आज व्हॉटसअप हे सगळ्यांना इतकं जवळचं झाल आहे की दिवस रात्र आपण व्हॉटसअप वरती काही ना काही बघत असतो, कोणाला तरी बोलत असतो. आपल्या रोजच्या जीवनातील सगळ्यात जास्त टाईम हा आपण व्हॉटसअप वरती घालवत असतो मग यात सगळ्याच वयोगटातील लोकं येतात , व्हॉटसअप चा हा वाढता वापर आपल्या डोळ्यांना हानिकारक ठरतोय अश्या अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आणि याच गोष्टीला लक्षात घेऊन व्हॉटसअप ने त्याच्या इंटरफेस सेटिंग मध्ये डार्क मोड अशी थीम अॅड् केली.

व्हॉटसअप ची डिफॉल्ट थीम ही अत्यंत चमकदार आणि डोळ्याला त्रास देणारी होती मुख्यकरून रात्रीच्या सुमारास या थीम चा खुप लोकांना त्रास होत असे .
डार्क मोड हे फीचर नव्याने व्हॉटसअप ने उपलब्ध करून दिल्याने याचा फायदा लोकांना चांगल्या प्रमाणात होताना दिसतोय.

आपण स्टेप बाय स्टेप समजुन घेऊयात हा मोड कसा ऑन करायचा आहे .

व्हॉट्सअँप ओपन केल्यानंतर उजव्या बाजुस वरती तीन डॉट असतील त्यावर क्लिक तुम्हाला सगळ्यात अगोदर जायचं आहे त्याला टच केलं की तुमच्या समोर पाच पर्याय दिसतील त्या पर्याय मधला शेवटचा सेटिंग आहे ,त्याला ओपन करायचं आहे .

ओपन झाल्यानंतर सेटिंग मध्ये दोन नंबर चा पर्याय Chats पर्याय दिसेल त्यात तुम्हाला जायचं आहे.

या मध्ये डिस्प्ले पर्याय एकदम पहिलाच, त्यात थीम पर्याय असेल त्यात जाऊन थीम निवडायचा ( Light & Dark)पर्याय समोर येईल आणि येथुन तुम्ही डार्क मोड निवडू शकता आणि तुमचा डार्क मोड ऑन करू शकता.

या फीचर  चा गैरवापर करून तरुण मंडळी रात्री आपल्या प्रियजनांना आता मनमोकळे बोलतात आहे, डार्क मोड मुळे आता व्हॉटसअप उजेड हा जास्त पडत नसल्याने यात तरुण मंडळीच चांगलच भागलय अस म्हणाव लागेल.या फीचर मुळे व्हॉटसअप वरती जे लोक आपला बिझनेस हॅण्डल करतात त्यांना मात्र याचा खुप फायदा झाला आहे आणि होत आहे.

WhatsApp च्या अश्या एक ना अनेक नवीन फीचर बद्दल माहिती आणि अपडेटसाठी आमच्या सोबत जोडलेले रहा .