व्हॉट्सअँप चे बटन फेसबुक पेज मध्ये कसे सेट करतात??

फेसबुक ने व्हॉटसअप चे अधिकार घेतल्यानंतर या दोन्ही प्लॅटफॉर्म वर बरेच बदल फेसबुक करत आलंय आणि भविष्यात सुद्धा अजुन काही नवीन गोष्टी ही  आपल्याला पाहायला मिळतील ,फेसबुक ने आपल्याला व्हॉटसअप चा उपयोग हा खुप सरळ असल्याने आपल्या बिझनेस पेज वरती  व्हॉटसअप चे बटन आपण तिथे वापरू शकतो अशी व्यवस्था फेसबुक ने आपल्याला उपलब्ध करून दिली आहे.फेसबुक वर व्हॉटसअप चे बटन वापर केल्याचा एक फायदा असा होतो की जे काही आपले कस्टमर म्हणा किंवा अजुन कोणी ज्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला ते या माध्यमांतून करू शकतात आणि याचा चांगला उपयोग आपल्या व्यवसायासाठी ही होतो तसेच कॉन्टॅक्ट वाढवण्यासाठी ही होतो.

फेसबुक पेज ला व्हॉटसअप चे बटन कशे सेट करायचे?

सगळ्यात पहिले बिझनेस पेज वर जायचे आहे .

 

पेज वरती कव्हर फोटो च्या खाली उजव्या बाजुस एक बटन असेल.त्याला क्लिक केले असता नवीन समोर येतील त्यात Contact You पर्याय असेल त्याला ओके करायचे आहे.

 

 

या नंतर नवीन पर्याय समोर येतील त्यात व्हॉटसअप हा पर्याय एकदम शेवटी आपल्याला दिसुन येईल त्याला Check करायचं आहे .

 

Add Number येईल त्यात व्हॉटसअप नंबर एंटर करायचा आहे.(Busines WhatsApp) असेल तर जास्त चांगलं राहील.

Connect Whatspp to Facebook  असा पर्याय येईल.

या नंतर आपला Country Code निवडून आपला फोन नंबर यात भरावयाचा आहे , आणि Send OTP वर ओके करायचे आहे, नंतर OTP Verification होऊन आपला नंबर पेज सोबत जोडला जाईल.

 

 

आपला बिझनेस मग तो कोणताही असो त्यात कम्युनिकेशन जितकं वेगाने होईल तितके फायद्याचे ठरते म्हणुनच फेसबुक अश्या नवनवीन गोष्टी घेऊन येत असतो ज्यामुळे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल.