फेसबुक इंस्टाग्राम ला कसे लिंक करतात?

आज फेसबुक ची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आपण बघतोय, फेसबुक आज फक्त सोशल मीडिया म्हणुन राहिलेले नाहीये तर त्यापेक्षा अजुन खुप पुढे गेले आहे हे सगळे आपण बघतच आलोय,इंस्टाग्राम चे अधिकार घेतल्यानंतर फेसबुक ने खुप काही गोष्टी या सोप्या करून दिल्या आहेत आणि त्या आपल्याला रोजच्या आणि व्यवसायीक जीवनात त्या खुप मदत करत आहे.फेसबुक सारखाच आज इंस्टाग्राम वर देखील तेवढाच त्याचा चाहता वर्ग आपल्याला पाहायला मिळतो दोघांचा इंटरफेस वेगळा आहे , परंतु दोघांचं महत्व आज सोशल मीडिया म्हणुन खुप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे आणि आज जो व्यक्ती फेसबुक वरती आहे तो इंस्टाग्राम वर सुध्दा आहे आणि या दोन्ही सोशल मीडिया आपल्याला हाताळायला सोप्या व्हाव्यात म्हणुन फेसबुक ने आपल्याला इंस्टाग्राम सोबत अकाऊंट लिंक करता येईल अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

फेसबुक इंस्टाग्राम ला कसे लिंक करतात ??

 

इंस्टाग्राम सोबत फेसबुक ला किंवा फेसबुक पेज ला लिंक करण्यासाठी सर्वप्रथम त्या पेज वरती जायचे आहे , आणि त्यानंतर पेज च्या उजव्या हाताला वरती Setting हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे .

च्या आतमध्ये आल्या नंतर डाव्या हाताला भरपुर पर्याय दिसतील, ( व्हॉटसअप सुद्धा येथुन तुम्ही फेसबुक सोबत लिंक करू शकता ) त्याच्या वरती तिथेच Instagram हा पर्याय सुद्धा असेल त्यावर क्लिक करायचे आहे .

      इंस्टाग्राम वरती क्लिक केल्यानंतर Connect Account असा पर्याय येईल त्याला ओके करून पुढे जायचे आहे.

  • अगोदरच तयार केलेले अकाऊंट असेल तर ते  लिंक करू शकता.
  • नवीन अकाऊंट सुद्धा येथुन तुम्ही तयार करू शकतात.

 

Connect Account वरती क्लिक केले असता लगेच एक इंस्टाग्राम ची विंडो ओपन होईल,यात आपल्याला जे इंस्टाग्राम अकाऊंट या फेसबुक पेज ला लिंक करायचे आहे त्याची माहिती म्हणजेच अकाऊंट चा आयडी आणि पासवर्ड यात भरावयाचा आहे .

 

इंस्टाग्राम चे अकाऊंट व्हेरिफिकेशन झाले की हे अकाऊंट आपल्या फेसबुक पेजशी कनेक्ट होऊन जाईल आणि तुमचे दोन दोन सोशल मीडिया वरती करावे लागणारे सारखेच उपडेटस कमी होतील.

इंस्टाग्राम हे तशे बघितले तर जाहिरातीसाठी पुर्णपणे फेसबुक वरती अवलंबुन असते इंस्टाग्राम जाहिरातीसाठी लागणारी पेमेंट मेथड ही फेसबुकचीच वापरते त्यामुळे जर तुम्ही एक व्यवसायिक असाल आणि ऑनलाईन मार्केटिंग करायची इच्छा असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवणं खुप गरजेचं आहे