आता पालकांचा असणार आपल्या मुलांच्या Tik-Tok वरती कंट्रोल.

शॉर्ट व्हिडिओ असणारे ऍप्लिकेशन म्हणजेच टीक टॉक आज भारतामध्ये खुप जास्त प्रसिद्ध  आहे, आणि  Lockdown मध्ये याच ऍप्लिकेशन चे युजर्स अजुन मोठ्या प्रमाणावर वाढले गेले आहे.टीक टॉक आजच्या तरुण तरुणींच्या गल्यातल मनात घर करून बसलं आहे सगळाच युवकवर्ग आज टीक टॉक वरती आपला  बराच वेळ घालवतोय , आणि यातील काही जन तर टीक टॉक सेलिब्रिटी सुद्धा झालेले आज आपण बघतोय.

टीक टॉक चा वाढता प्रभाव बघुन आज पालकवर्गाची चिंता वाढली आहे सतत टीक टॉक वरती व्यस्त असणारी मुले कशी व्हिडिओ बनवत आहे ,काय करत आहे अशे एक ना अनेक प्रश्न पालकवर्गातुन समोर येत आहे तसेच सुरेक्षेच्या दृषटिकोनातून हे ऍप्लिकेशन सोयीस्कर नाही असे सुद्धा म्हणले जाऊ लागले होते.

 

मात्र पालकांच्या या सगळ्याच प्रश्नांवर टीक टॉक ने उत्तर शोधुन काढले आहे, पालकांना असणाऱ्या सगळ्या खबरदारीचे पर्याय म्हणुन एक नवीन फीचर  टीक टॉक घेऊन येत आहे.

हे महत्त्वाचे का आहे: टीकटॉक लहान व तरुण वयातील मुलांमध्ये लोकप्रियतेत वाढत आहे, परंतु त्या वाढीमुळे मुलाच्या सुरक्षा आणि गोपनीयतेच्या उपाययोजनांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे

तपशीलः 30 एप्रिलपासून,टीक टॉक 16 वर्षाखालील वापरकर्त्यांसाठी थेट संदेश पाठवणे बंद करणार आहे.येत्या आठवड्यात ही कंपनी एक नवीन "Familly Pairing" साधन आणत आहे यात पालकांचे स्वतः चे अकाऊंट हे आपल्या मुलांच्या टीक टॉक अकाऊंटला लिंक करणं आता शक्य होणार आहे . 

यामुळे आता पालकांकडे मुलांच्या टीक टॉक अकाऊंटचा पुर्ण कंट्रोल असेल. आपली मुले दररोज टीकटॉकवर किती वेळ घालवू शकतात. लहान मुलांसाठी योग्य नसलेल्या व्हिडिओंवर प्रतिबंध घालण्याच्या निर्णयासह  त आपली मुलं कोणते व्हिडिओ बघु शकतात अशी सुद्धा त्यात सुविधा असेल.

खात्यावर कोण संदेश पाठवू शकते (पालक 16 वर्ष किंवा त्यापेक्षा मोठ्या वयाच्या मुलांसाठी डायरेक्ट संदेश सुविधा वापरता येणार आहे.)