व्हॉटसअप मेसेज फॉरवर्ड करण्यावर असणार आता अशी मर्यादा.

व्हॉट्सअँप आज आपल्या सगळ्यांसाठी लोकप्रिय आणि महत्वाचं बनले आहे,लहान मोठ्या गोष्टी तसेच आजूबाजूला  घडणाऱ्या घटना यांची माहिती काही क्षणात आपल्या पर्यंत येऊन पोहोचते आणि अश्या गोष्टी प्रत्येकजन एका पासुन दुसऱ्यापर्यंत फॉरवर्ड करून कळवत असतो,परंतु यावर फेक मेसेजेस फॉरवर्ड करण्याचे प्रमाण सध्या खुप वाढले आहे असे निदर्शनास आले आहे.

व्हॉट्सअँप कम्युनिकेशनसाठी सगळ्यात सरळ आणि सोप्पा पर्याय ठरला आहे,जवळपास सगळेच आज व्हॉट्सअँपने एकमेकांना आपण जोडले गेलो आहोत.

सध्या कोरोना व्हायरस ने जगात हाहाकार माजविला आहे आणि कोरोना बद्दलच्या उलट सुलट बातम्या ,फेक मेसेजेस, ऑडियो आणि व्हिडिओ सगळीकडेच पसरिवले जात आहे , त्यामुळे लोकांमध्ये दहशदीचे वातावरण निर्माण होत आहे, याच गोष्टीचा गंभीर विचार करून व्हॉटसअप ने आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आता मेसेज फॉरवर्ड करण्यावर काही मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे , अगोदर पाच व्यक्तींना एक मेसेज फॉरवर्ड करता येणारी सुविधा आज एका व्यक्तीला एक मेसेज फॉरवर्ड करता येईल अशी करण्यात आली आहे.

ही मर्यादा व्हॉटसअप अपडेट केलेल्यांसाठीच असणार आहे तसेच मेसेज कॉपी पेस्ट  करून तुम्ही पाहिजे तेवढ्या व्यक्तींना पाठऊ शकता ,त्यामुळे  फेक मेसेजेस ला कितपत आळा घालता येईल हे येत्या काही दिवसात समोर येईलच परंतु मेसेज फॉरवर्ड करण्यावर जी मर्यादा घालण्यात आली आहे त्याने नक्कीच काही प्रमाणात का होईना मदत होणार आहे.

या अगोदर फेसबुक, गुगल, आणि ट्विटर या सारख्या माध्यमांनी ही काही गोष्टींचे बदल केले आहे आणि व्हॉटसअप ने केलेल्या या बदलाचे सगळ्यांकडून स्वागत केले जात आहे.