फेसबुक ने आणला आहे व्हिडिओ कॉलिंग चा हा जबरदस्त पर्याय.

जगात जवळपास आज सगळीकडेच कमी जास्त प्रमाणात LOCKDOWN लागु केलेला आहे आणि त्यामुळे या काळात सोशल नेटवर्किंग साईटचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय असे निदर्शनात आले आहे,आज सगळेचजन घरात अडकून असल्याने आपल्या प्रियजनांना व्हिडिओ कॉल वरती बोलण्यासाठी वेगवेगळ्या एप्लिकेशन्सचा शोध घेताना दिसताय.सध्या LOCKDOWN मध्ये व्हिडिओ कॉलिंग ची मागणी ही युजर्स कडून वाढली आहे आणि यात जे ऍप्लिकेशन चांगली सुविधा उपलब्ध करुन देईल त्यांना लोक पसंती देतात आहे , आणि तशे बदल सुद्धा बऱ्याच प्रसिद्ध अॅप मध्ये त्या त्या कंपनीच्या लोकांनी केला आहे ,नातेवाईकांना बोलण्यासाठी तसेच ऑफिस मधील कामांसाठी व्हिडिओ कॉलिंग ही सर्वात जास्त केली जात आहे.

आज प्रत्येकजन अश्या परिस्थितीत वर्क फ्रॉम होम  करतोय,वर्क फ्रॉम होम ही संकल्पना अवलंबुन घरूनच काम करणाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे आपल्या वरिष्ठ लोकांना कनेक्ट राहणे हे गरजेचे असते त्यासाठी त्यांनी बऱ्याच ऍप्लिकेशन चा वापर या काळात केला आहे (झूम,गुगल duo,अशे बरेच)

 

 

अश्या परिस्थितीत आपल्या युजर्सला असलेली गरज बघता फेसबुक ने सुद्धा व्हिडिओ कॉलिंग हा पर्याय एका वेगळ्याच लेव्हल वरती जाऊन लाँच केला आहे , यात तब्बल ५० व्यक्ती एकाच वेळेस सहभागी होऊ शकतात आणि एकमेकांना बोलू शकतात तेही कसलेही वेगळे ऍप्लिकेशन डाऊनलोड न करता.

फेसबुक ने ग्रुप व्हिडिओ कॉल हा पर्याय आपल्या युजर्सला वयक्तिक व ऑफिसियल या दोन्ही गोष्टींचा विचार करून उपलब्ध करून दिला आहे यासाठी युजर ला फेसबुक मेसेंजर वरती जाऊन एक रूम क्रिएट करायची आहे आणि त्या रूम ची लिंक त्या सगळ्या लोकांना पाठवायची आहे ज्यांना तुम्ही व्हिडिओ कॉल करू इच्छिता, ज्या व्यक्तींना तुम्ही लिंक पाठवताय त्यांचे फेसबुक अकाउंट नसले तरी सुद्धा ते या ग्रुप कॉल मध्ये सहभागी होऊ शकतात.

ग्रुप कॉल बद्दल माहिती.

ग्रुप कॉल मध्ये एकाच वेळी ५० लोक सहभागी होऊ शकतात, तसेच जो युजर रूम क्रिएट करेल तो या ग्रुप ची लिंक फेसबुकच्या टाईमलाईन , ग्रुप, व इव्हेंट वरती शेअर करू शकतो , तसेच 
व्हॉट्सअँप, टेक्स्ट मेसेज, अश्या सगळ्या पद्धतीने लिंक तुम्ही शेअर करू शकतात.

ग्रुप कॉलिंगच्या नियम व अटी

- रूम कोणी क्रिएट केली ,हे कोणाला दिसणार या वरतीही नियंत्रण ठेवता येणार आहे 
- रूम लॉक व अनलॉक सुद्धा करता येणार आहे (सदस्य मर्यादा)
- रूम क्रिएट करणारा व्यक्ती यात उपस्थित असणे आवश्यक असणार आहे. 
- या ग्रुप कॉल मध्ये कोण सहभागी होणार कोण नाही होणार याचा कंट्रोल पुर्ण रूम क्रिएट करणाऱ्या व्यक्ती कडे असणार आहे.
- रूम क्रिएट करणारा व्यक्ती हा कोणत्याही सदस्य व्यक्ती ला चालु कॉल मध्ये काढू  किंवा सहभागी करू शकतो.

 

 

कशी करणार रूम क्रिएट?

- MASSENGER ओपन करा
- स्क्रीन च्या सगळ्यात खाली पीपल या ऑप्शन वरती टच करायचे आहे .
- क्रिएट रूम वरती क्लिक करा आणि युजर ला सहभागी करा.किंवा रूम ची लिंक शेअर करा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरती