व्हॉट्सअँप वरती येणाऱ्या फेक न्यूज आता तपासता येणार.

व्हॉट्सअँपचा खुप सोप्प्या पद्धतीने करता येणारा वापर आणि आकर्षक असणारा इंटरफेस यामुळे पुर्ण जगात तसेच सगळ्याच क्षेत्रात व्हॉटसअपचा वापर करणारा वर्ग हा खुप मोठा आहे,युजरबेस मोठ्या प्रमाणावर असल्याने यावर फेक न्यूज पसरवण्याचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे आणि ही गोष्ट लक्षात घेऊन व्हॉट्सअँप ने यावर आपले एक नवीन फीचर लाँच केले आहे,ज्यावरती तुम्ही चेक करू शकता की तुमच्या पर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी या खऱ्या आहेत की नाही.

 

 

सतत फेक न्युज व्हॉट्सअँप वरती फॉरवर्ड होताना बघुन व्हॉटसअप ने पायंटर या संस्थेच्या इंटर नॅशनल फॅक्ट चेकिंग नेटवर्क (INFCN) सोबतभागीदारी केली असुन (INFCN) ने आपले चॅटबॉट व्हॉट्सअँप वरती लाँच केले आहे.

कसे असणार हे फीचर?

हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये एक नंबर कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये सेव्ह करायचा आहे, चॅटबॉट चा नंबर +1(727)2912606 
हा नंबर सेव्ह केल्यानंतर या नंबर वरती 'Hi' हा मेसेज इंग्रजी मध्ये पाठवायचा आहे त्यानंतर हे फीचर अॅक्टिव होईल ,सध्या फक्त इंग्रजी भाषेत हा पर्याय उलब्ध आहे थोड्याच दिवसात हा पर्याय सगळ्याच भाषेमध्ये उपलब्ध होईल असे कंपनी कडून कळवण्यात आले आहे.

तुम्ही व्हॉट्सअँप वरती आलेल्या न्यूज मुख्येकरून कोरोना संबधित असलेले मेसेज व इतर गोष्टी तुम्ही या नंबर वरती पडताळुन बघु शकता,कोरोना बद्दल चुकीची माहिती पसरवली जात असल्यामुळे हा निर्णय व्हॉटसअप ने खूप कमी वेळेत घेत हे फीचर लाँच केले आहे

व्हॉट्सअँप लवकरच 'व्हॉट्सअँप-पे' भारतात लाँच करणार!!

भारतात असणारी एकुण लोकसंख्या आणि इथे ऑनलाईन पद्धतीचा वाढणारा वापर लक्षात घेऊन व्हॉट्सअँप लवकरच ऑनलाईन पेमेंट चा हा पर्याय आपल्या समोर घेऊन येणार आहे