व्हॉट्सअँप बिझनेसच्या फीचर्सचा वापर करून वाढवा तुमचा व्यवसाय अगदी कमी वेळेत.

लघुउद्योग आणि त्यांचे ग्राहक यांच्यात समन्वय साधणे सोप्पे व्हावे यासाठी व्हॉट्सअँपने व्हॉट्सअँप बिझनेस लाँच केले अगोदरच वापरात असलेल्या व्हॉट्सअँपने आणि त्याच्या साध्या आणि समजणाऱ्या इंटरफेसमुळे ते सगळ्यांचे आपले बनले आहे, त्यातच काही व्यवसायिक  बदल करून व्हॉट्सअँप बिझनेस हे आपल्या समोर व्हॉट्सअँपने आणले आहे.बिझनेस संदर्भात असल्याने त्यात तसे फीचरसुद्धा आपल्याला बघायला मिळतील जे की आपल्या व्यवसायासाठी खुप फायद्याचे ठरणार आहे.

भारतात व्हॉट्सअँप  बिझनेस लाँच होऊन २ वर्ष झाले असुन यात आत्तापर्यंत अनेक बदल करण्यात आले आहे.

व्हॉट्सअँप बिझनेस हे मुख्यत्वे लघुउद्योगांना व त्यांच्या ग्राहकांना जोडण्यासाठी म्हणुन लाँच करण्यात आले होते परंतु आज लहान मोठे अशे सगळेच म्हणजे ५० लाखांपेक्षा जास्त उद्योग हे व्हॉट्सअँप बिझनेस वरून पुर्णवेळ त्यांचा बिझनेस बघतात.

 

 

व्हॉट्सअँप बिझनेस महत्वाचे फीचर.

 


 

Business Profile :   यावर तुम्ही स्वतःची बिझनेस प्रोफाइल तयार करू शकता ज्यात व्यवसायाची पूर्ण माहिती लिहून अधोरेखित करू शकतात तसेच तुमच्या व्यवसायाचा वेळ आणि आठवड्याचे व्यवसायिक वेळापत्रक जाहीर करू शकता.

तुमच्या व्यवसायाची वेबसाईट तुम्ही Business Profile  मध्ये अपडेट करू शकतात.

शॉर्ट लिंक हा पर्याय सुद्धा Business Profile मध्ये असल्याने तुम्ही तुमच्या बिझनेस नंबरची व्हॉटसअप लिंक तुम्ही येथुन डिरेक्ट लोकांना शेअर करू शकता.

Catlog                 :   हा एक उत्तम आणि बिझनेसला उपयुक्त राहील असा पर्याय आहे यात प्रॉडक्टचे फोटो आणि त्याची माहिती याची व्यवस्थीत  मांडणी करून त्याची माहितीसह यात जतन करून ठेऊ शकता व नव्या ग्राहकाला  एका क्लिक वरती नंतर तुम्ही पाठऊ शकता.

Away Message   :   कार्यालयीन वेळेनंतर किंवा तुम्ही जेव्हा बिझी असतात अश्या वेळेत या पर्यायाचा अवलंब तुम्ही करू शकता. म्हणजे समोरचा व्यक्ती तुम्हाला नंतर कार्यालयीन वेळेत कॉल करू शकेल.

Quik Reply          :   यात तुम्ही ठराविक प्रश्नांची उत्तरे टेक्स्ट मध्ये, अथवा फाईल फॉरमॅट मध्ये सतत पाठवली जाणारी PDF जतन करून ठेऊ शकता आणि "/" या द्वारे सर्च करून समोरच्या व्यक्तीला सेंड देखील करू शकतात.

 

 धनयवाद!!