टीक टॉक लवकरच भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर!!

टीक टॉक आणि भारतातील लोकांचं नात तस आज पर्यंत खुपचं जवळच अस होत, करमणूक होत असल्याने या ऍप्लिकेशनला लोकांनी भरभरून अशी प्रसिध्दी दिली, युवकांमध्ये तर ते एवढे प्रसिद्ध झाले की त्यात काही जनांना लोकांनी स्टार असे घोषित सुद्धा परंतु याच टीक टॉक ऍप्लिकेशनला आज खुप वाईट दिवस आले आहे,त्याच कारण म्हणजे टीक टॉक आणि यूट्यूब यांच्यातील चॅनल मालकांमध्ये पेटलेला वाद.

टीक टॉक फेम असणाऱ्या अमीर सिद्दीकी या व्यक्तीने आपल्या व्हिडिओतुन यूट्यूबर्स ची खिल्ली उडवली आणि तेथुन या वादाला सुरवात झाली, या व्हिडिओ वरती रोष व्यक्त करत यूट्यूब जगतात दिग्गज असणाऱ्या कॅरी मीनाटी या यूट्यूब युजर्स ने अमीर सिद्दीकी याचा आपल्या भाषेत समाचार घेतला.

 

 

परेश रावल यांनी सुद्धा टीक टॉकला Ban करा अशे ट्विट केले आहे.


 

कॅरीच्या या व्हिडिओ ने इंटरनेट जगतात अक्षरशः धुमाकूळ घातला ,लाखो करोडो लोकांनी या व्हिडिओला बघितले आणि शेअर सुद्धा केले, परंतु अशे व्हिडिओ आमच्या पॉलिसीमधे बसत नाही असे सांगुन यूट्यूबने कॅरीचा तो व्हिडिओ यूट्यूब वरुन हटवला या प्रकरणानंतर सर्व दिग्गज यूट्यूबर्स मंडळींनी एकत्र येऊन त्यांनी कॅरीला  #SupportCarry असा पाठिंबा दर्शवला  व टीक टॉक आपल्या फोन मधुन डिलीट करावे अशे आव्हान सुद्धा केले.

कोरोना मुळे चायना बद्दल वाढत जाणारा रोष आणि हे अँप सुद्धा चायनीज असल्याने  या प्रकरणाला चांगलीच हवा मिळाली आणि लाखो लोकांनी या अँपला रेटिंगमधे एक स्टार देऊन डिलीट केले.भारताची एकूणच लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणावर असल्याने या एप्लिकेशन ची रेटिंग तब्बल ४.६ वरून १.३ एवढी खाली फक्त ३ दिवसात आली आहे.

भारता सारख्या देशात फेमस होण आणि उध्वस्त होण हे इथल्या जनतेच्या मनावर अवलंबुन आहे हे आज टीक टॉक ला चांगलंच समजलं असणार आहे.